मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना शिस्त लावावी - देवेंद्र फडणवीस
अनलॉकबाबतचा गोंधळ सरकारमधील श्रेयवादामुळेच निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
मुंबई : अनलॉकबाबतचा गोंधळ सरकारमधील श्रेयवादामुळेच निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. महाविकास आघाडीत समन्वय नाही, मुख्यमंत्र्यांऐवजी ५ - ५ मंत्री घोषणा करतात. त्यामुळे श्रेयवाद दिसून येतोय अशी टीका त्यांनी केली. शिवाय मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना शिस्त लावावी असं म्हणतं देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
'सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे. पण ते कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करत नाहीत. मुख्यमंत्र्यांऐवजी ५ - ५ मंत्री घोषणा करतात. त्यामुळे श्रेयवाद दिसून येतो. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. श्रेय घ्यावं पण काम केल्यावर. अनेकदा गोंधळ झाला. पण काल जास्तचं झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना शिस्त लावावी. धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे.' असं फडणवीस म्हणाले.
पुढे फडणवीस म्हणाले, 'राज्यात लॉकडाऊन आहे की नाही असे अनेकांचे फोन आले. पण तेव्हा आमच्याकडे उत्तर नव्हतं. लॉकडाउनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे.' यावेळी फडणवीस मागासवर्ग आयोग म्हणजे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असं देखील म्हणाले. मराठा समाजाला राज्याला आरक्षण द्यायचं नाही.असं देखील म्हणाले.
'कायदा करायचा अधिकार राज्याचा आहे. राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल मंजूर करून तो केंद्राच्या मागासवर्गीय आयोगाकडे पाठवायला लागतो. तुम्ही लोकांना संमत करू शकत नाही तर गोंधळ निर्माण करू नका...' वेळेवर आयोग स्थापन न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं असं देखील फडणवीस म्हणालं.