भंडारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा दौऱ्यावर जात आहेत. दुर्घटनाग्रस्त जिल्हा सामान्य रूग्णालयाची ते आज पाहणी करणार आहेत. नवजात बालकं गमावलेल्या पालकांचं सांत्वन ते करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह अतिरिक्त सचिव आशिष सिंह, परिवहनमंत्री अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित असतील. भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी इथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्य़ात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १२ वाजता भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः दुर्घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबांचं सांत्वन करणार आहेत.