सातारा : मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर मध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरला गर्दी करताना दिसताहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज महाबळेश्वरचे तापमान सकाळी ६ वाजता ८.२ अंश सेल्शियसपर्यंत खाली आलं. तिकडे परभणीत काल नींचाकी तापमानाची नोंद झाली. आज मात्र पारा काहीसा वधरालाय.आज सकाळी तापमान 8.4 अंश सेल्शियस नोंदवण्यात आलं. 


ही बोचरी थंडी अजून वाढत जाण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविली आहे. तिकडे उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा क़डका कायम आहे. आज नाशिक शहरातलं तापमान 9.2 अंशावर स्थिरावलं. तर निफाडमध्ये पारा 8.0 अशांपर्यंत खाली आला.