नागपूर-गेल्या दोन महिन्यांपासून शहरात नागनाल्यात वावर असलेल्या मगरीची चर्चा सुरू होती. मात्र वन विभागाला हुलकावणी देऊन लपंडाव करणाऱ्या मगरीला काल अखेर वन विभागाने रेस्क्यू केलेआहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  शहरात महिन्याभरापासून शहराच्या  मध्यवर्ती भागात पत्रकार कॉलनी, महाराज बाग, मोक्षधाम घाट रोड येथील नागनाल्यात  प्रत्यक्ष  मगर दिसून आल्याने नागपूर शहरात खळबळ उडाली होती. मगरीला बघण्यासाठी नाग नदीच्या काठी बघ्यांची गर्दी दिसत होती. नागपूर वन विभागाने या परिसरातील नाल्यांच्या परिसरात वन विभागाचे रेस्क्यू टीम व कर्मचारी यांनी शोध मोहीम राबवले होते.लगतच्या स्थानिक रहिवाशांना सतर्कतेचा आवाहन  करून जाहीर सूचनाचे फलक लावण्यात आले होते. वन विभाग सातत्याने मगरीची शोध मोहीम राबवत होते.पण मगर सतत हुलकावणी देत होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत तिच्या नेमक्या वास्तव्याचा अंदाज आला त्यामुळे महाराज बाग परिसर परिसरातील नाल्यात पाळत ठेवण्यात आली होती.  या परिसरात मगरीचा वावर दिसून आली होती. वन विभागाने तातडीने हा परिसर आपली रणनीती आखली.  पकडण्याचे प्रयत्न सुरू केले त्यासाठी कोल्हापुर-सांगली ची रेस्क्यू टीम बोलावण्यात आली होती. ही चमू शनिवारी एक जानेवारीला दुपारी नागपुरात दाखल झाली.नागपुरात पोहचल्यानंतर  काही तासातच म्हणजे रविवारी पहाटे त्या मगरीला पकडण्यात या टीमला यश आले.


 कोंबडीचा चारा देऊन मगरीला अडकवले


या मगरीला पकडण्यासाठी नागपूर  वन कर्मचारी आणि रेस्क्यू टीमने शनिवारी  या परिसरातील पाहणी केली. मगरीचा सुरक्षित रेस्क्यू साठी दोन 'ट्रॅप केज'बसविण्यात आले होते. त्यात कोंबड्याच्या मासाचे तुकडे टाकण्यात आले होते. रविवारी पहाटे तीन वाजता चा सुमारास ही मगर या पिंजर्‍यात अडकली व तीला रेस्क्यू  करण्यात आले. मगरीच्या वैद्यकीय तपासणीत सुदृढ असल्याचे समोर आले. त्यामुळे तिला तोतलाडोह येथील जलाशयात सोडण्यात आले.