चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेला मृतदेह नेला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात
चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेला तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेल्याची घटना मालेगावात घडली.
मनमाड : चितेवर अंत्यविधीसाठी ठेवलेला तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेल्याची घटना मालेगावात घडली. एका निनावी फोननंतर पोलिसांनी दखल घेत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
कलेक्टर पट्टा भागात राहणाऱ्या नेहा चौधरी या १८ वर्षाच्या युवतीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. विशेष म्हणजे नेहाचा वाढदिवसादिवशीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ११ वाजता तिच्या पार्थिवावर श्रीरामनगरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात होते.
मात्र, निनावी फोनवर एका अज्ञात व्यक्तीने नेहाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा सांगितले. आणि पोलिसांनी दखल घेत थेट स्मशानभूमी गाठली. अंत्यसंस्कारसाठी चितेवर ठेवलेला नेहाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.