मुंबई : Ajit Pawar on MHADA House : आमदारांना म्हाडाची घरं देण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान केले आहे. घरांबाबतचा निर्णय कदाचित रद्द केला जाईल, असे अजितदादा म्हणालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना 300 घरे देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेला भाजप आणि मनसेने विरोध केला होता. राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असलेल्या म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतून ही घरे देण्यात येणार होती. या निर्णयाला सामान्यांनी विरोध सुरु करताच ही घरे फुकट देणार नसल्याचे मंत्री आव्हाड यांनी नंतर सारवासार केली होती.


त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांच्या घरांबाबत पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली होती. महाविकास आघाडीने आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयाला शरद पवार यांचा विरोध केला आहे. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन घर दिली पाहिजे, असे शरद पवार म्हणालेत.


 एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा थेट इशारा


दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज शेवटची मुदत आहे. अन्यथा उद्यापासून कठोर निर्णय घेणार आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्या जागेवर नवी भरती केली जाईल, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.