डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची मागणी
सावित्रीबाई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातून आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांनी केलीय.
पुणे : सावित्रीबाई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातून आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांनी केलीय.
वाणिज्य विभागातील अभ्यासक्रमात ' वास्तू उद्योगयाचे अग्रणी डी. एस. कुलकर्णी ' हा धडा आहे. हे पुस्तक १५ जून २०१३ मध्ये प्रकाशित झाले, तेव्हापासून अभ्यासक्रमात आहे. त्यानंतर डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे आरोप झाले. त्यामुळे केवळ हा धडाच नव्हे तर हे पुस्तक मागे घ्यावं अशी मागणी टकलेंनी केलीय.