Mumbai Coastal Road Inauguration : मुंबई माहापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजक्ट असलेला कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबईतील किनारी (कोस्टल ) मार्गाचा बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्ह पर्यंतचा विभाग येत्या आठ दिवसात सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. कोस्टल रोडमुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात पूर्ण होणार आहे.


प्रवासाच्या वेळेत 70 टक्के तर इंधनात 34 टक्के बचत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतला कोस्टल रोड लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत 70 टक्के तर इंधनात 34 टक्के बचत होणारेय. मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर केवळ आठ मिनिटात कापता येणारेय कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.  वरळी ते मरीन ड्राईव्ह असा 9 किलोमीटरच्या कोस्टल रोड आहे. या चारपदरी मार्गावर ताशी 80 ते 100 किमी वेगाने वाहने धावतील. 


कोस्टल रोडवर बसेसलाही परवानगी


कोस्टल रोडवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त असणार आहे. रोडवर एन्ट्री, एक्झीट, बोगद्यासह 24 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. भुयारी मार्गावर प्रत्येक 100 मीटरवर पब्लिक अॅड्रेस स्पिकर बसवण्यात आलेत.  विशेष म्हणजे या रस्त्यावर बसेसलाही परनानगी दिली जाणार आहे.


कोस्टल रोड उद्घाटनाच्या प्रतिक्षेत


कोस्टल रोड हा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरील एकत्रित  चर्चेला ते उत्तर देताना येत्या आठ दिवसात कोस्टल रोड प्रवाशांसाठी खुला होईल अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. यावेळी विरोधकांनी उद्योग विभागावर केलेले आरोप सामंत यांनी आकडेवारी मांडत फेटाळून लावले. महायुती सरकारच्या काळात गेल्या 16 महिन्यात महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत आणि उद्योग जगतात क्रमांक एक वर राहिला आहे, आणि यापुढेही कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावर्षी दावोस मध्ये 3 लाख 72 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले, त्यापैकी दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला राज्य सरकारने जागाही उपलब्ध करून दिली आहे, असं सामंत यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 80 हजार कोटी रुपयांचे समांजस्य करार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला पण त्यापैकी ऊर्जा संबंधित  50 हजार कोटींचा सामंजस्य करार सापडतच नाही याकडे उदय सामंत यांनी लक्ष वेधलं. मुंबईत राबवलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचा 100 टक्के फायदा झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.गिरणी कामगारांच्या घरासाठी ठाण्यात 22 हेक्टर जागा उपलब्ध झाल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.