Chandrapur Crime News : चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञाचा स्वतःच्या रुग्णालयातच आढळला मृतदेह आढळला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या डॉक्टरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघड झालेले नाही. पोलिसांनी डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेवून पोस्टपार्टेमसाठी पाठवला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूमागचे नेमके कारण उघड होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर उमेश अग्रवाल असे मृत डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर उमेश अग्रवाल हे नेत्ररोगतज्ञ आहेत.  साई आय हॉस्पिटल नावाचे त्यांचे स्वत:चे रुग्णालय आहे. रुग्णालयामध्येच त्यांचा मृतदेह आढळला आहे. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत शस्त्रक्रिया केल्यानंतर थकलो आहे. थोडा वेळ झोपतो मला कुणीही उठवू नका असे हॉस्पिटल स्टाफला सांगते ते केबीनमध्ये झोपले.


सुमारे तासाभरानंतर कुठलीही हालचाल न जाणवल्याने स्टाफने केबिनमध्ये प्रवेश केला. यावेळी  डॉक्टर उमेश अग्रवाल मृत अवस्थेत आढळले. यामुळे हॉस्पीटल स्टाफ गोंधळला. तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 
डॉक्टर अग्रवाल यांच्या पत्नी देखील आहेत ख्यातनाम डेंटिस्ट आहेत.  तर,  मुलगा आहे वैद्यकीय शिक्षण घेत असून अंतिम वर्षाला आहे. त्याच्या मृत्यू कशामुळे झाला याबाबत संभ्रम आहे. डॉक्टरांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा देखील रंगली आहे. 


टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार 


टॉर्चच्या उजेडात उपचार घेण्याची वेळ रुग्णांवर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी सोमवार रात्रीपासून विजेचा लपंडाव सुरू होता. मात्र सध्या पूर्ण वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णालयात काळोख पसरला. त्यामुळे रुग्णांवर डॉक्टर, तसंच वैद्यकीय कर्मचा-यांना मोबाईलमधील टॉर्चच्या मदतीने उपचार करावे लागले. रुग्णालयातील पंखेही बंद असल्यानं रुग्ण उकड्यानं पुरते हैराण झाले. तसंच वीज नसल्यानं संगणक बंद असल्यानं, त्याचा फटका रुग्णालयाच्या प्रशासकीय कामावर झाला. 


चाऱ्यातून विषबाधा, 45 मेंढ्यांचा मृत्यू


हिंगोलीच्या जडगाव परिसरात हिरव्या चाऱ्यामधून विषबाधा झाल्याने 45 मेंढ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मेंढपाळ भीमराव कुबडे व मोहम्मद कुरेशी हे नेहमीप्रमाणे जडगाव शिवारात आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी हिरव्या चारयातून मेंढ्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, 45 मेंढ्याचा मृत्यू झाल्याने मेंढपाळाचं मोठं नुकसान झाले.