हात पाय दुखत असल्याचं सांगत डॉक्टर नर्सच्या रूममध्ये गेला अन्... धक्कादायक घटना समोर
डॉक्टरने नर्ससोबत केलेल्या कृत्याने नाशिक हादरलं
नाशिक : एका डॉक्टरने अल्पवयीन परिचारिकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरात अंबड येथील बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यानुसार नाशिकच्या अंबड पोलीसात पीडितेच्या तक्रारीवरून पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने नाशिक शहर हादरून गेलं असून आरोपीचे नाव डॉ. उल्हास कुटे असं आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे खाजगी रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह वैद्यकीय क्षेत्रात या घटनेची मोठी चर्चा आहे.
संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे यांनी पीडीतेच्या रूममध्ये प्रवेश करत असताना माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असं सांगून रूममध्ये प्रवेश केला. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. प्रवेश केल्यानंतर डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर बळजबरी करत शारीरिक अत्याचार केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.अत्याचार केल्या नंतर संशयित आरोपी कुटे याने पीडित तरुणीला धमकी दिल्याचंही तक्रारीत सांगितलं.
ही बाब जर कुणाला सांगितली तर तुला कामावरून काढून टाकील अशी धमकीही डॉक्टरने दिली. मात्र, तरुणीने नातेवाईकांच्या मदतीने ही बाब थेट पोलिसांत सांगितली. अंबड पोलिसांनी या घटनेची दखल गांभीर्याने घेत गुन्हा दाखल केला आहे.