जळगाव : राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणा-या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीचा ग्राहकांमध्ये मोठं उत्साह दिसून आलाय.


गुढीपाडव्यानिमित्त प्रतितोळा ३० हजार ४५० प्रतितोळा


विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून प्रतितोळा ३१ हजारांवर पोहचलेल्या सोन्याचा दर गुढीपाडव्यानिमित्त प्रतितोळा ३० हजार ४५० एवढा करण्यात आला आहे. त्यामुळं एकीकडं विविध योजना आणि दुसरीकडं दरातही सवलत मिळाल्यानं ग्राहक खुश आहेत.