पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका महिलेनं पती आणि तीन मुलांसह पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.
कोल्हापूर : जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका महिलेनं पती आणि तीन मुलांसह पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.
दरम्यान, पोलिसांनी महिलेसह तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतल्याने पुढचा अनर्थ टळला आहे. सफिका शिकलगार असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव असून ती पुजारी मळा इथं आपल्या कुटुंबियासोबत राहतेय.
मागील काही दिवसांपासून सासू, दिर यांच्यासोबत यांच्यासोबत कौटुंबिक वाद सुरु होते. यातून सफिका आणि तिचा पती समीर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन मारहाण झाली होती.
यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुनही दखल घेत नसल्याने सफिकाने संपूर्ण कुटुंबीयांसह आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने पुढचा अनर्थ टळला आहे.