दौड : 'हे माझं सरकार' या पंचलाईनसोबत आपल्या प्रतीमेबाबत जोरदार मोहीम सुरू केलेल्या फडणवीस सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नवे अश्वासन दिले आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर 25 हजार रूपयांची रक्कम देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटले आहे.


रकमेत वाढही होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. दरम्यान, शेतकऱ्यांना प्रोस्ताहनपर रक्कम देण्याचे अश्वानस देताना ही रक्कम कर्जमाफी योजनेंतर्गत सरकार देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, या रकमेत वाढही केली जाणार असल्याचे ते म्हणाले.


अंमलबजावणी कधी?


दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना अश्वासन तर दिलेच. पण, या अश्वासनाच्या अंमलबजावणीबाबत बोलताना कर्जमाफी योजनेचं काम पूर्ण झालं की, यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.