वेब सिरिज शूटिंग सुरु असताना दोन गटांत हाणामारी

कासारवडवली गावात एका वेब सिरिजच्या शूटिंगदरम्यान जोरदार हाणामारी झाली.
ठाणे : जिल्ह्यातील कासारवडवली गावात एका वेब सिरिजच्या शूटिंगदरम्यान जोरदार हाणामारी झाली. यात काहींची डोकीही फोडण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले. वेब सिरिजचे शूटिंग करण्यात येत असताना काही लोकांनी विरोध केला. त्यावेळी वादावादी झाली. त्यानंतर दोन गटांत जोरदार हाणारी झाली.
घोडबंदर येथील एका फॅक्टरीत शूटिंग करण्यात येत होते. आम्ही रितसर परवानगी काढलेली होती. मात्र, चार लोक नशेत आले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी विरोध करत आमच्या टीममधील सहकाऱ्यांवर हल्ला केला. तुम्ही आमची परवानगी घेतली नाही. असे सांगत हल्ला चढवला. अनेकांवर काठ्यांनी हल्ला केला. त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे आमचे काही लोक जखमी झाले आहेत. महिला कलाकार हिच्यावरही या लोकांनी हल्ला केला. अनेकांना मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साकीत साने यांनी केली आहे.
कासारवडवली गावातील एक फॅक्टरीमध्ये हिंदी वेब सिरिजचे शूटिंग सुरु होते. यावेळी चार तरुणांनी दादागिरी करत शूटिंग करणाऱ्या टीमवर हल्ला केला. यावेळी काहींनी प्रतिकार केला. शूटिंगच्या लोकेशनवरून वाद निर्माण झाल्याने ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शूटिंग करणाऱ्या टीमला जोरदार मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या हालचारील सुरु होत्या. या मारहाणीत तीन ते चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहेत.