अमर काणे, झी मीडिया, नागपूर: जमिनीपासून तब्बल 26 मिटरवरून अर्थात डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअर वरून मेट्रो (metro) धावतानाचे पहिले दृश्य टिपली गेली आहेत. गड्डीगोदाम येथे मेट्रोचा हा फोर लेयर (four layer) वाहतूक व्यवस्था असलेला उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे. या उड्डाणपुलाच्या चौथ्या माळ्यावरून मेट्रो धावणार आहे. त्याच्या ट्रायलचा व्हिडिओ लोकांच्या भेटीला आला आहे. फोर लेअर वाहतूक व्यवस्थेत जमिनीवरून नागपूर-कामठी वाहतूक मार्ग. दुसऱ्या लेयरमध्ये रेल्वे मार्ग तिसऱ्या लेयर मध्ये एलआयसी चौक जवळून ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत जाणारा 5.4 किलोमीटरचा उड्डाणपूल आणि सर्वातवरती म्हणजे जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंचीवरून नागपूर मेट्रो चौथ्या लेअरवरून धावणार आहे. (The first view of the metro running from the fourth layer of the double-decker flyover 26 meters above the ground)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक या मेट्रोच्या मार्गावर हा फोर लेयर अद्भुत वाहतूक व्यवस्था साकारण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यात नागपूर मेट्रोच्या दोन मार्गाचे लोक लोकार्पण करणार आहेत. कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक आणि बर्डी ते प्रजापतीनगर असा हा मार्ग आहे. त्यावेळी या फोर लेयर उड्डाणपुलाच्या चौथ्या माळ्यावरून मेट्रो ने प्रवासाची अनुभूती नागपूरकर घेऊ शकणार आहे. 



काय आहे मेट्रोची खासियत? 


11 डिसेंबर रोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्डीतील झिरो माईल स्थानकापासून ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. त्याच मार्गावर नुकतीच मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आणि तीच दृश्य आपण या व्हिडीओतून पाहू शकतो. गड्डीगोदाम परिसरात मेट्रोचा हा फोर लेयर वाहतूक व्यवस्था असलेला उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. सर्वात खाली जमिनीवरून नागपूर-कामठी दरम्यानचा सडक मार्ग आहे. दुसऱ्या लेयरमध्ये भारतीय रेल्वे मार्ग आहे. तिसऱ्या लेयरमध्ये एलआयसी चौकाजवळून ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत जाणारा 5.4 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल राहणार आहे. आणि सर्वात वरती म्हणजे जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंचीवर चवथ्या लेयरमध्ये नागपूर मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यात नागपूर मेट्रोच्या दोन मार्गांचे लोकर्पण होणार आहे. त्यामध्येच हा मार्ग ही असणार आहे.