IMD Rain Update Maharashtra:   राज्यातील काही भागात पुढील 3-4दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. 2 सप्टेंबर रोजी राज्यात आनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. हवामान विभागाचा अंदाज एकदम खरा ठरला आहे.  पुढील चार दिवस कायम राहणार  पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. यानंतर आता पुढील चार दिवस हवामान कसे असेल? अलर्ट देण्यात आलेल्या   खरचं धो धो पाऊस पडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागातर्फे मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. हवामान विभागाच्या अंदानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुढील चार दिवस कायम राहणार असल्याचं अंदाज वर्तवण्यात आला आहे.


महाष्ट्रातील 'या' जिल्ह्याना पावसाचा अलर्ट


धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


लातूर जिल्ह्यात 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरूय. पावसाने दाणादाण उडवलीय. तेरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून. नदीवरील सर्व दरवाजे ३० सेटींमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग केला जातोय. शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होतेय... हवामान विभागाने आँरेज अलर्ट जारी केलाय .प्रशासनाने नदीकाठच्या 100 गावांना  सतर्कतेचा इशारा दिलाय.... 


छत्रपती संभाजीनगरला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. पुढील 48 तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय..पावसामुळे मुंबईहून सिकंदराबादला जाणारी देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आलीय.. तशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय...
तर बस रद्द करण्याचा निर्णय एसटी ऐनवेळी घेणार असल्याची माहिती आहे..