मराठा आरक्षणावरील सुनावणी निवडणुकीनंतर
रजिस्ट्रार कोर्टाने २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता विधानसभा निवडणुकांनंतर सुनावणी होणार आहे. रजिस्ट्रार कोर्टाने २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. महाराष्ट्र सरकारने चार आठवड्यांचा अवधी मागितला होता परंतु न्यायालयाने सरकार आणि इतर पक्षकारांना नोव्हेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल दिला होता. उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती.