जालना, झी मीडिया, नितेश महाजन : ऑनर किंलीगवर(Honor killing) आधारीत असलेल्या सैराट(Sairat) चित्रपटापेक्षा डेंजर घटना जालना(Jalana) येथे घडली आहे. मुलगी पळून गेल्यानं समाजात बदनामी झाल्याने बाप आणि चुलत्याने या मुलीला भायनक शिक्षा दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृत तरुणीच्या पित्यासह तिच्या काकांना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत तरुणीचे दूरचा नातेवाईक असलेल्या एका तरुणासह प्रेमसंबध होते. ही तरुणी घरात काहीही न सांगता नातेवाईक असलेल्या तरुणासह तीन दिवस घराबाहेर राहिली.  यामुळे समाजात अपमान झाल्याचा संताप व्यक्त करत मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिला झाडाला लटकवून गळफास दिला. ही हत्या नसून तरुणीने आत्महत्या केली असल्याचे भासवण्यासाठी या दोघांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने तिची हत्या केली. यानंतर  अंत्यविधी करुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला.  गावात चर्चा झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 


मनाला हेलावणारी ही घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे अशी या प्रकरमातील संशयीत आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडीलांसह काकांविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.