धक्कादायक, वादातून अंगावर टँकर घालून पती-पत्नीला चिरडले
जमिनीच्या वादातून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्येय अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेन गावात पाहायला मिळाला.
ठाणे : जमिनीच्या वादातून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्येय अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेन गावात पाहायला मिळाला. वासुदेव शेंद्रे आणि रेखा शेंद्रे या पती-पत्नीला याच वादात आपला जीव गमवावा लागला आहे. हे दाम्पत्य दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या पाण्याच्या टँकरने त्या दोघांना मागून येऊन चिरडले. या प्रकरणी पोलिसांनी विलास पाटील, विनोद पाटील, बाळाराम पाटील आणि टँकर चालक यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. टँकर चालकास अटक केली आहे. विलास पाटील आणि शेंद्रे कुटुंबीय यांच्यात जमीवरून वाद सुरु होता.
दबा धरुन दोघांना पाठिमागून चिरडले
जमिनीच्या वादातून पती पत्नीची अंगावर पाण्याचा टँकर घालून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेन गावात घडला आहे . या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकास पोलिसांनी अटक केली आहे . जमिनीच्या वादातून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्येय अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेन गावात पाहायला मिळाला. याच गावात राहणाऱ्या वासुदेव शेंद्रे आणि रेखा शेंद्रे या पतिपत्नीला याच वादात आपला जीव गमवावा लागला आहे. काल संध्याकाळच्या सुरमारास वासुदेव शेंद्रे आणि रेखा शेंद्रे हे पती पत्नी आपल्या दुचाकीवरून एका हळदी समारंभाला जात होते . मात्र त्यांना माहित नव्हते कि काळ त्याची वाट पाहत होता. याच रस्त्यावर एका दबा धरून बसलेल्या पाण्याच्या टँकरने त्या दोघांना मागून येऊन चिरडले यात वासुदेव शेंद्रे आणि रेखा शेंद्रे पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
टँकर चालकाला पोलिसांनी केली अटक
ज्या टँकर ने या दोघांना चिरडले तो टँकर विलास पाटील याचा होता. विलास पाटील आणि शेंद्रे कुटूंबीय यांच्यात जमीवरून वाद सुरु होता. जमिनीवरून पाटील आणि शेंद्रे कुटुंबामध्ये रोजच भांडणे सुरु होती. याच वादातून आपल्या काकांची हत्या केल्याचा आरोप कैलास यांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी विलास पाटील, विनोद पाटील, बाळाराम पाटील आणि टँकर चालक यांच्याविरोधात उल्हासनगच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. टँकर चालकास पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनने नाऱ्हेन गावात संतापाचे वातावरण आहे .वाढणाऱ्या जमिनीच्या किमती आणि त्यामुळे होणारे जमिनीचा वाद एवढ्या टोकाला जातात आणि त्यामुळे संपूर्ण कुटूंब उध्वंस होत आहेत.