मुंबई : राज्यात थंडीचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात थंड वारे वाहत आहेत. राज्यात पुन्हा एकदा गुलाबी थंडीने दखल दिली आहे. दिवाळीपूर्वी वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाचा चांगलाचं तडाखा बसला. पण आता राज्यात थंडी परतली आहे. राज्यामध्ये ८.८ अंशांपर्यंत तापमान घसरले आहे.  राज्यभरात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात थंडीला सुरूवात झाली. पण अचानक तापमान वाढू लागल्यामुळे मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान २५ अंशावर पोहोचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सांताक्रूझमध्ये तापमान १८.४ अंश आहे. तर नाशिकमध्ये ११.१ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. शिवाय परभणी ८.८, जळगाव १२.६, नागपूर १२.४ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा थंडीने चादर पसरली आहे. 


दरम्यान, राज्यात कोरोना वाढीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. येत्या काळात देशात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे कोरोनाची ही  साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर उपाययोजना राबवत आहे. 


राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १८ लाख ४२ हजार ५८७ वर पोहोचली असून आतापर्यंत १७ लाख १० हजार ५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत राज्यातील 47,599 जणांनी आपला जीव गमवला आहे.