पुणे : पुण्यात उघडकीस आलेल्या बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्याला दिल्ली विमानतळावरून अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिटकॉइन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भारद्वाजनं विदेशात पलायन केलं होते. त्याच्या ८ साथीदारांनी पोलिसांनी आधीच अटक केली. अमित भारद्वाजला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणांची मदत घेतली. भारद्वाज याने गेन बिटकॉइन या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून सुमारे ८ हजार जणांना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. 


गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून त्याने काही हजार कोटींची फसवणूक केलीय. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. भारतासह १५ देशांतील गुंतवणूकदारांनी गेन बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातून ७ लाख बिटकॉइनमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती आहे.