नितेश महाजन, झी मीडिया, संभाजीनगर : विविध कारणांमुळे तरुणांची लग्न (marriage) रखडतात. संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) मात्र, एका तरुणाचे लग्न निवडणूका (election) जाहीर होत नसल्याने रखडले आहे. यामुळे लवकरात लवकर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी या तरुणाने केली आहे. आपल्या या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्याने अनोखी बॅनरबाजी करत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सह मनपा आयुक्तांना याबाबतचे निवेदन देखील दिले आहे. या  तरुणाचा प्रताप पाहून अधिकारी देखील वैतागले आहेत. रमेश पाटील (Ramesh Patil) असे या तरुणाचे नाव आहे. यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये रमेश याने संभाजीनगरमध्ये अनोखे बॅनर लावले होते. निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे अशा आशयाचे हे बॅनर होते. 


निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2022 असे ठळक अक्षरात लिहलेले हे बॅनर होते. मला तीन अपत्य असल्याने निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. (जातीची अट नाही) वय 25 ते 40 असावे. अविवाहित, विधवा, घटस्फाेटीत चालेल. फक्त दोन अपत्य (मुले) पेक्षा जास्त असणारी चालणार नाही’, असा मजकूर त्याने या बॅनरवर छापला होता. संभाजीनगर शहात लावलेले त्याचे हे बॅनर सोशलमीडियावरही व्हायरल झाले. यानंतर  भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी बॅनर फाडत यावर शाईफेक देखील केली होती. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात बॅनर लावणाऱ्या रमेश पटीलवर गुन्हा दाखल झाला होता. 


बायको मिळाली


वर्षभरानंतर रमेश पाटील याने पुन्हा बायको मिळाली असे बॅनर लावले आहेत. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळाला.  संपूर्ण महाराष्ट्रातुन मला 5 ते 6 हजार महिलांचे फोन आले. त्यातील तीन महिला निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे रमेश पाटील याचे म्हणणे आहे. मला निवडणूक लढविण्यासाठी बायको मिळालेली आहे.त्यामुळे तातडीने निवडणूक जाहीर करा. जो वॉर्ड आरक्षित होईल त्या संवर्गातील महिलेशी मी लग्न करणार आहे. यामुळे लवकरात लवकर निवडणूक आरक्षण जाहीर करा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून रमेश पाटील याने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,महसुल आयुक्त यांच्याकडे केली आहे. रमेश पाटील असं ही भन्नाट मागणी करणाऱ्या तरुणांचं नाव आहे.


कोण आहे रमेश पाटील?


रमेश पाटील हा संभाजीनगर शहरातील दलालवाडी भागात राहणारा आहे. रमेश पाटील याला मानपाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र, कोरोना आणि इतर कारणांमुळे निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात पाटील याला तिसरे अपत्य झाले. यामुळे तो आता निवडणूक लढवू शकत नाही. यामुळे दुसरे लग्न करुन या बायकोला त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. यामुळे लवकरात लवकर निवडणूक आरक्षण जाहीर करा अशी मागणी त्याने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण शहरात् होर्डिंग्ज लावणार असल्याचा इशारा रमेश पाटील याने दिला आहे.