कल्याण : शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत किरीट सोमैय्या यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या या रणांगणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उतरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई येथे असलेल्या सोमैय्या यांच्या कंपन्यांबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यावरून राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे. आता पुढची बॅटिंग बघू अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.


कल्याण डोंबिवलीमधील विविध विकास कामांचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. कोव्हिडसारख्या कठीण काळात या ठिकाणी रस्त्याचे, पुलाचे काम सुरु होते. पूर्ण एमएमआर रिजनचा विकास करणे हे आमचे ध्येय आणि धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. 


ड्रीम प्रोजेक्ट्सला विरोध नाही, पण वन वाचवण्याचा प्रयत्न
नागपूर - अजनी वन प्रकल्पाला पर्यावरण वाद्यांनी विरोध केलाय. हा प्रकल्प केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टला वैयक्तिक विरोध नाही. मात्र, नागपूरकरांनीच ड्रीम प्रोजेक्ट्सला विरोध केलाय. त्यामुळे येथील वन वाचवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल त्याचा विचार करतोय असंही ते म्हणाले. 


रोजगाराच नुकसान होऊ नये याची दक्षता
डोंबिवली एमआयडीसीमधील 156 कंपन्या स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला. उद्योजकांनी याला विरोध केलाय. पण, रोजगाराचं कुठेही नुकसान होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत.


प्रदूषण होत असल्यामुळे जिथे रेड इंडस्ट्रीसाठी जागा आहे तिथे त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. स्थलांतराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणि रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.