केडीएमसीच्या महापौरांना पुन्हा करायची आहे रुग्णसेवा
केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांना पुन्हा करायची रुग्ण सेवा करायची
डोंबिवली : कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. हा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता आरोग्य कर्मचारी अपुरे पडतील काय ? असा गंभीर प्रश्न उभा राहीलाय. आरोग्य क्षेत्राचा अनुभव असलेल्यांना मुख्यमंत्र्यानी आवाहन देखील केले आहे. दरम्यान केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांना पुन्हा करायची रुग्ण सेवा करायची आहे. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
महापौर नगरसेविका होण्याआधी त्यांना मुंबई महानगर पालिकेच्या बी. वाय. एल नायर रुग्णालयात ३२ वर्ष परिचारिका म्हणून कामाचा अनुभव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर महापौर विनिता राणे यांनी पुन्हा रुग्णसेवा करण्याची इच्छा दर्शवली. त्यांनी तसे पत्र आयुक्तांना देऊन कायदेशीर अनुमती देखील मागितली आहे.
रुग्ण सेवेचा प्रदीर्घ अनुभव माझ्या गाठीशी आहे. सध्याच्या परिस्थिती माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील माझे सर्व सहकारी डॉक्टर्स परिचरिका रुग्णालयातील सर्व स्टाफ जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत.
असे असताना मी पेशाने परिचारीका असल्याने माझे मन मला स्वस्थ बसू देत नसल्याचे त्या म्हणाल्या.
म्हणून मी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी सेवा देण्याची माझी इच्छा त्यांनी व्यक्त केली.