अमरावती, औरंगाबाद :  राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना बाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे अमरावती, औरंगाबाद आणि हिंगोली येथे दिसून येत आहे. असे असताना लॉकडाऊनचे नियम अनेक ठिकाणी धाब्यावर बसविले जात आहेत.


१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीत आणखी चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ६५वर पोहोचलीय. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. अमरावतीच्या रुग्णालयात ५० जणांवर उपचार सुरूयत. तर ५ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. अमरावतीच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झालाय. 


औरंगाबादेत २४ रुग्ण पॉझिटिव्ह


औरंगाबादेत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चाललाय. औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी २४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत. शहरात आता कोरोनाबाधितांचा आकडा ३२१वर पोहोचला आहे. आकडा वाढत चालला असल्याने चिंता व्यक्त होत आहे.


 २२ जवानांना कोरोनाची लागण


हिंगोलीत आणखी राज्य राखीव दलाच्या २२ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत बंदोबस्ताला गेलेल्या २२ जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. आतापर्यंत ६९ जवानांना कोरोनाची लागण झालीय. हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ७६वर पोहोचलीय. जिल्हा रुग्णालयातल्या २४ वर्षीय परिचारिकेलाही कोरोना झालाय. तसंच एक रुग्ण बरा झालाय. तर ७५ जणांवर उपचार सुरु आहेत.