mumbai news: गाड्या पार्क करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सावध राहिला नाहीत तर...
Mumbai Bike News: सध्या बाईतक चोरीच्या घटना आपल्या अनेकदा ऐकायला मिळतात. या घटनांची अनेकदा पुनरावृत्ती होताना दिसते आहे. त्यामुळे सगळीकडे कायमच खळबळ माजलेली असते. सध्या अशाच एका प्रकारनं सगळीकडेच खळबळ माजवली आहे. ही घटना बोरिवली येथे घडली आहे.
गणेश कवडे, झी मीडिया, बोरिवली: सध्या सगळीकडेच गाड्या, बाईक चोरीच्या घटना घडताना आपण पाहतो आहोत. शहरात आणि गावातही असे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. सध्या अशाच एका प्रकरानं सगळीकडे खळबळ माजवून दिली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या (cctv footage) आधारे मात्र पोलिसांना तडक त्या गुन्हेगाराचा शोध लागला आहे. परंतु सध्या अशा घटना वाढू लागल्या असून सध्या आपण सगळ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे. यासंबंधी पोलिसांनी कारवाई (police news) केली असून सध्या या प्रकरणी पोलिस आणखी तपास करत आहेत. तुम्हीही तुमची बाईक पार्क करत असाल तर वेळीच सावध व्हा. (The police arrested the accused ones who stole the cars in the parking slot)
बोरिवली रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंग मध्ये उभ्या करण्यात आलेली बाईक चोरीची घटना घडली होती. अशी तक्रार बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती .बाईक पार्किंग केल्यावर याठिकाणी पार्किंग वाल्याकडे चावी ठेवण्यात आली होती मात्र पार्किंग (bike parking crime news) वाल्याने आपल्या मित्राच्या संगणमताने गाडीची चावी चोरी झाल्याचे सांगितले व मित्राला चावी देऊन गाडी चोरी (crime news) करून त्याने पळ काढला होता. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास करून पार्किंग वाल्याला अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव कृष्ण राम भूषण पांडे असं आहे.
हेही वाचा - viral video: भर कार्यक्रमात हास्याचे फवारे; मुख्यमंत्र्यांच्या मिश्लिकीनं जिंकली उपस्थितांची मनं
वाचा नक्की काय घडली घटना?
बोरीवली येथे 3 डिसेंबर रोजी एक बाईक चोरीची केस आमच्याकडे रिजस्टर झाली होती. तेव्हा आमच्या अधिकारांच्या ज्या गोष्टी सीसीटीव्ही तपासणीत दिसून आल्या त्यावरून या चोरीचा तपास करण्यात आला आहे. कृष्णा पांड या आरोपीला आम्ही अटक केली आहे. हा आरोपी मध्यप्रदेशचा आहे. तो कुठेही काम करत नाही. त्याच्याकडे राहायला घरही नाही. त्यामुळे त्याच्यावर कुठलाही गुन्हा नोंदवलेला नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिली. या आरोपीने आणखी अशाच प्रकारे किती गाड्या चोरी (car parking) केल्या आहेत याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्याचा साथीदार मित्र सध्या फरार असून याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे, त्यामुळे तुम्ही देखील तुमची गाडी पार्किंगमध्ये उभी करून कामावर जात असाल जरा सावधान तुमच्यासोबत देखील असा प्रकार घडू शकतो.