मुंबई : ग्रामीण भागातले जनावरांचे आठवडी बाजार बंद होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात होणाऱ्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर केंद्र सरकारनं अनेक निर्बंध घातले आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने कायद्यात दुरुस्ती करून हे निर्बंध घातले आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवडी बाजारातली जनावरं कत्तलखान्यासाठी खरेदी, विक्री करण्यात बंदी घालण्यात आली आहे. गाय, बैल, वासरू, म्हैस, रेडा आणि रेडकू यांच्या खऱेदी-विक्रीसाठी नव्या अटी घालण्यात आल्या आहेत. जनावरे विकताना ती कत्तलखान्यात जाणार नाहीत, याची लेखी हमी विक्री करणाऱ्याला स्थानिक बाजार समितीला द्यावी लागणार आहे. आठवडी बाजारात जनावरे खरेदी करणाऱ्यालाही तशी लेखी हमी द्यावी लागणार आहे. जनावरे विक्रेते आणि खरेदीदार यांना स्वतःच्या छायाचित्रासह जनावरांचे छायाचित्र जोडावे लागणार आहे. या अटींमुळे आठवडी बाजारात गुरे विकायला शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत.