प्रणव पोळेकर, रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र, याला त्याचा काकांना विरोध केला आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष जागेवर न जाता मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे हा लिलाव होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी खेड येथे येऊन लिलाव केल्या जाणाऱ्या मालमत्तेची पाहणी केली. जे बोलीधारक या लिलावात भाग घेणार आहेत, तेदेखील या अधिकाऱ्यांसोबत उपस्थित असल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतल्या मालमत्तेचा होत असताना आता दाऊदचा काका पुढे आला आहे. आणि त्याने या लिलावाला विरोध केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात मुंबके गाव आहे. मुंबकेत दाऊदचा बंगला आणि आंब्याची बाग आहे. केंद्र सरकार या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास त्यांच्या  काका इस्माईल कासकर यांनी आक्षेप घेतला नोंदवला आहे.


स्थानिक नेत्यांनीही जाहीर लिलावाला विरोध आहे. दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यापेक्षा गावातल्या शेतकऱ्याला ती जमीन देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत माजी सरपंच अकबर दुधूके यांनी तसे म्हटले आहे. सरकारच्या लिलावाच्या निर्णयाला विरोध नाही पण वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव होत असल्याने दाऊदचा काका नाराज झाला आहे.