भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांचा राजीनामा
भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
सांगली : भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. भाजपचे खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील, भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुकाध्यक्ष संग्राम माने यांनी राजीनामा दिला आहे. भाजपने या दोघांना पक्ष विरोधी काम केल्याबद्दल नोटीस बजावली होती. भाजपचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ गैरहजर आणि पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवला होता. तसेच गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारात सक्रिय असल्याने, भाजपने नोटीस बजावली होती. भाजपचे आटपाडी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी हे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.