औरंगाबाद : कोरोना काळात राज्य सरकारने कोणालाही पॅकेज दिलं नाही, कोणालाही फुटक्या कवडीची मदत केली नाही. काही झालं तरी फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकारने केलं असल्याची खोचक टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. शेतकऱ्यांना, दुकानदारांना किंवा रिक्षावाल्यांही सरकारने मदत केली नाही. तर दुसरीकडे मात्र छोट्या राज्यांनी त्याठिकाणी मदत केली पण महाराष्ट्र सरकारने कोणतीच मदत केली नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे राज्य सरकारला याचा पदवीधरसंघाच्या निवडणुकीत मोठा फटका बसण्याचा अंदाज देखील फडणवीस यांनी वर्तवला. सध्या ६ मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यामुळे यंदा भारतीय जनता पक्षावर  जनता विश्वास दाखवेल असं देखील ते म्हणाले. 



त्याचप्रमाणे सरकारमधील तीन पक्ष एकत्र आले तरी जनता त्यांच्यावर विश्वास न दाखवता त्यांना पराभूत करेल अशी दाट शक्यता देखील देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी व्यक्त केली.