COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  राज्य सरकारने सनातनवर बंदी आणण्याचा नव्याने  प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिलीयं. आधीच्या प्रस्तावात तृटी होत्या त्यानंतर नवा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी केले सर्व आरोप चुकीचे असल्याचे केसरकर यांनी सांगितले.  ATS नेच सर्व माहिती CBI ला दिली असून ATS च्या कामगिरीचा सरकारला अभिमान असल्याचे ते म्हणाले. 


बंदीची मागणी


दाभोळकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेले लोक सनातन संस्थेशी संबंधित असून त्यांचा  राज्यात घातपात करण्याचा कट होता असं मत विधानसभा विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी मांडलंय. 'सनातनवर बंदी घाला अशी मागणी आम्ही गेले दोन वर्ष करतोय...मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एटीएसचे हात बांधले आहेत, सनातनवर कारवाई होऊ नये यासाठी दबाव टाकला जातोय', असा आरोपही विखे पाटलांनी केलाय. याबाबत कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना भेटणार असून सनातनचे प्रमुख जयंत आठल्ये यांना अटक करण्याची मागणी विखे पाटलांनी केली.