अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात साई समाधीला काचा लावत साईभक्तांना गेल्या काही वर्षांपासून मनोभावे दर्शन घेण्यापासन साईबाबा संस्थानकडून रोखण्यात येत होते. आता या विरोधात आंदोलन तीव्र झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विरोधात शिर्डी ग्रामस्थांनी या आधीही आंदोलन केल होतं. मात्र, साई संस्थानंन आपली भूमिका बदलली नसल्यानं ग्रामस्थांना आक्रमक पवित्रा घेत साई मंदिरातील काचा काढत त्या प्रशासकीय इमारीतच्या गेटवर लावत आंदोलन केलं. 


दरम्यान, साईमंदिरात जातांना भक्तांना रस्त्यावरुन जाणा-या वाहनांचा धक्का लागण्याची भीती आहे. या ठिकाणी स्कायवॉक साई संस्थान बांधत नाही अशा अनेक सुविधा प्रलंबबित आहेत. शिर्डीतील ग्रामस्थ आणि साई संस्थान यांच्यातील संघर्ष आता तीव्र होण्यास सुरुवात झालीय.