मुकुल कुलकर्णी, नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून नाशिकमध्ये आल्हाददायक थंडी आहे. थंडीचं माहेरघर म्हणून नाशिकची ओळख होते. वेगवेगळ्या रूपात थंडीचं अस्तित्व जाणवतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्हा हा निसर्गरम्य जिल्हा.  प्रत्येक ऋतूत नाशिक पर्यटकांना भूरळ घालतं. मात्र त्यातही थंडीचा महिना नाशिकसाठी विशेषच असतो. 


नाशिक शहरात पारा 8 अंशांवर स्थिरावलाय. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख नाशिक जिल्ह्याची आहे. निफाडमध्ये राज्यातलं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलंय. नाशिक शहराचे तसे अनेक अभिमान बिंदू. मात्र इथली थंडीही नाशिककरांना विशेष आवडते. 


बोचरी , गुलाबी आणि आल्हाददायक थंडी 


बोचरी थंडी, गुलाबी थंडी, आल्हाददायक थंडी असे विविध प्रकार इथे पाहायला मिळतात. गोदाकाठावरची थंडी सूर्यकिरणांच्या साक्षीने सोनेरी रूप घेऊन येते. कधी पक्षाच्या भ्रमंतीप्रमाणे ऐलतिरावरून पैलतिरावर मुक्त संचार करते. क


धी मैदानाच्या हिरवळीवर कधी जॅगिंग ट्रॅकच्या ग्रीम जिमवर कधी कॉलेज कट्ट्यावर तर कधी बहरलेल्या गुलाबाच्या शेतावर ही थंडी खास साथ देते. या थंडीने नाशिककरांना व्यायामाची गोडी लावली. या थंडीने नाशिककरांना सायकलिंगचं वेड लावलं, सकाळच्या फ्रेश वातावरणात नाशिककरांना स्वतःसाठी वेळ काढण्याची सवयही तिनेच लावली. 



कॉलेज जीवनावर थंडीचा प्रभाव


कॉलेज जीवनावर, फॅशन दुनियेवरही थंडीचा प्रभाव जाणवतो. थंडीमुळे फॅशनची संधी मिळते. बाजारपेठेते वुलनचे कपडे, जॅकेट्स, मफलर, मुलींसाठी स्टोल, पंच्यू शॉल असे विविध फॅशन ट्रेंड बाजारात आलेत. दीडशे रूपयांपासून ते 5 ते 10 हजारांपर्यंत विविध कपडे बाजारात आलेत. 


उत्तरेत थंडीचा लाट आलीय. देशाच्या नंदनवनात हिमवृष्टी होतेय. त्याचा परिणाम म्हणून नाशिकमध्ये आणखी काही दिवस ही सखी राहणार आहे. त्यामुळे नाशिककर खुश आहेत.