सांगली : पतंगराव कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यातील सर्व गावं बंद ठेवण्यात आली आहेत. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 


कदम यांच्या जाण्याने सांगली जिल्हा पोरका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पतंगराव कदम यांच्या निधनाने काँग्रेस पक्ष आणि सांगली जिल्ह्याची मोठी हानी झालीय. आर. आर. पाटील, मदन पाटील आणि त्यानंतर आता पतंगराव कदम यांच्या जाण्याने सांगली जिल्हा पोरका झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या जयश्री मदन पाटील आणि महापौर हारून शिकलगार यांनी दिलीय.


अंत्यदर्शनासाठी पतंगरावांच्या निवासस्थानी मोठी गर्दी


दरम्यान, पतंगराव कदम यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी म्हणजेच सिंहगड बंगला इथं ठेवण्यात आलं आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी पतंगरावांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे. सर्वसामान्यांसह, राजकारणी आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी पतंगराव कदम यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.