सिंधुदुर्ग :  ओखी चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसलाय.. समुद्राच्या अजस्त्र लाटा किना-यावर धडकू लागल्यात.. या लाटांमुळे मांडवी किना-यालगतच्या काही घरांमध्ये रात्री पाणी शिरलंय.. या लाटांचा आवाज मोठा विचीत्र येतो आहे. या लाटांची उंची तब्बल 20 ते 25 फूट इतकी होती.


नेहमीच्या भरतीपेक्षा ही भरती वेगळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर  पौर्णिमेला समुद्राला भरती येते मात्र कालची भरती मोठी होती.. खवळलेला समुद्र पहाण्यासाठी नागरिकांनी मांडवीच्या किना-यावर गर्दी केली होती. नागरिकांना सतर्कतेचा इशारा मिळूनही अनेकदा नागरिक किनारपट्टीकडे धाव घेत असल्याच्या प्रकार घडतो आहे. त्यामुळे काही अनुचीत प्रकार घडल्यास जीवीताला धोका पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.


आमदार उदय सामंतांचीही समुद्राकडे धाव


खवळलेल्या समुद्राची माहिती मिळताच रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनीही किनाऱ्याकडे धाव घेतली. किनारपट्टीवर मांडवी प्रमाणेच रत्नागिरीच्या मिऱ्या बंधारा इथंही अजस्त्र लाटांचं तांडव सुरु होतं.. या लांटांमुळे अनेक ठिकाणी बंदारा फुटलाय.. या लाटांची उंची तब्बल 20 ते 25 फूट इतकी होती. रत्नागिरीच्या राजिवडा बांध इथंही सुमुद्राचं पाणी आत शिरलंय.. तर आदमपूर गुहागर येथील वेळणेश्वर इथल्या घरांमध्ये समुद्राचं पाणी शिरलंय.. दालोलीतल्या पाजपंढरीमध्येही लाटांनी मोठं नुकसान झालंय.. तर पर्यटकांच्या आवडीच्या मुरुड किना-याचीही मोठी धूप झालीये.