सोनू भिडे, नाशिक:- 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतीच्या दशक्रिया विधीला आलेल्या पत्नीने पतीचा घातपात झाला असल्याचा आरोप केले आणि नातेवाईकांनी त्याच विधवा पत्नीला काळे फासून चपलेचा हार घातला इतकेच नव्हे तर थेट गावात भर वस्तीतून धिंड काढल्याची घटना चांदवडच्या शिवरे गावात घडली आहे. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात आठ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


काय घडली घटना
विधवा महिला, आई आणि तिचे पती चांदवड तालुक्यातील शिवरे  या गावी  राहतात. काही दिवसांपूर्वी विधवा महिलेचा अपघात झाला होता यात या महिलेचा हात फ्रॅक्चर झाला होता. महिलेवर उपचार करून तिच्या देखभालीसाठी पतीने तिला माहेरी सोडले होते. यानंतर पती दोनही  मुलांसोबत एकदा पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. मात्र त्यानंतर पत्नी माहेरी असतानाच पतीने गळफास घेत आत्महत्या केली होती. पतीने आत्महत्या केली असल्याची माहिती महिलेला देण्यात आली होती.  मात्र सोमवारी पतीचा (Husband) दशक्रिया विधी असल्याने विधवा महिला पुन्हा आपल्या सासरी शिवरे गावी रविवारी आली. सोमवारी दशक्रिया विधी सुरु असताना माझे पती आत्महत्या (Suicide)  करू शकत नाही त्याचा घातपात झाला आहे असा संशय विधवा महिलेने व्यक्त केला. याचा राग आल्याने नणंदेने तिला मारहाण (Beating) करण्यास सुरूवात केली. यानंतर विधवा महिलेच्या चेहऱ्याला काळे फासत चपलेचा हार घालून तिची गावात धिंड काढण्यात आली. 


महिलेने केली तक्रार 
विधवा पत्नीने पोलिसांना आप बीती सांगितल्यानंतर सोमवारी मध्यरात्री बरयाच वेळ बसून होती मात्र पोलिसांनी तिची दखल घेतली नाही. अखेर विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक आणि आयजी यांना धारेवर धरल्याने विभागीय पोलीस अधिकारी गावात हजर झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दबाव बघता पिडीतेला बोलावून माहिती घेत अखेर वडनेर भैरव पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तपासात जो दोषी असेल त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार असल्याच पोलीसा कडून सांगण्यात आल आहे.  


नीलम गोऱ्हे यांनी दिले कारवाईचे आदेश
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधवा महिलेसोबत घडलेल्या घटनेची माहिती घेतली असून याबाबत पोलीस महासंचालकांना चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.