जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य १५ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद
चंद्रपूर जिल्ह्यात असलेला जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून १५ ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे. ताडोबाच्या इतिहासात स्थापनेपासून पहिल्यांदाच अशाप्रकारे व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्यात आलाय.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात असलेला जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून १५ ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे. ताडोबाच्या इतिहासात स्थापनेपासून पहिल्यांदाच अशाप्रकारे व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्यात आलाय.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने म्हणेजच NTCA ने पावसाळी पर्यटन बंद करण्याचे कठोर निर्देश जारी केल्यामुळे १ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे. ताडोबाच्या बाह्य भागात सुरु असलेलं पर्यटन देखील बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने ताडोबातील एकूणच व्यवहार ४ महिने ठप्प होणार आहेत.
या निर्णयामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. ज्या पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग केली होती त्या पर्यटकांना रक्क्म परत केली जाणार आहे.