धुळ्यात एसटी खाली उडी मारुन तरुणाची आत्महत्या
धुळे शहर बस स्थानकात एसटी बसखाली उडी मारुन तरुणाने आत्महत्या केलीय.
धुळे : शहर बस स्थानकात एसटी बसखाली उडी मारुन तरुणाने आत्महत्या केलीय. भूषण कैलास शिंपी असं या तरुणाचं नाव आहे. बस स्थानकातून बाहेर निघणाऱ्या चालत्या बस खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केलीय.
बस खाली उडी घेतल्याने भूषणचा जागीच मृत्यू झालाय. मृत तरुण पारोळा इथला रहिवाशी असून त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुरुवातीला हा अपघात असल्याचे बोललं जात होतं. मात्र सीसीटीव्हीतून ही आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालंय.