देशभरात चोरीच्या अनेक घटना घडत असतात. यामध्ये चोरांनी वापरलेल्या क्लुप्त्या पाहून नेहमीच पोलिसांसह नागरीकांचे देखील डोके चक्रावायचे. अशीच डोके चक्रावणारी चोरीची (Robbery Case) घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपी तक्रारदाराच्या दुकानावर येऊन रोज 20 रूपयाचा नाश्ता करायचा आणि दुकानदाला (Shopkeeper) पैसै देखील द्यायचा, तरीही तो त्याला दररोज चुना लावून जायचा. मात्र तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, 20 रूपयाचा नाश्ता करून कसा गंडा घालायचा? चला जाणून घेऊयात. 


दररोज 20 चा नाश्ता करायचा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी दररोज नागपूरच्या (Nagpur crime) सदर मार्ग येथे शम्मी रामप्यारे दुकानात (Shopkeeper) येऊन नाश्ता करायचा. दररोज आरोपी 20 रूपये खर्चुन नाश्ता करायचा. पैसे देऊन झाल्यावर उरलेली रक्कम घेऊन घरी परतायचा. अशाप्रकारे तो दुकानदाराला गंडा घालायचा. 


दररोज खिशातून 500 ची नोट काढायचा


या चोराची (Robbery Case) विशेष बाब म्हणजे, तो दररोज सकाळी दुकानावर नाश्ता केल्यानंतर पैसे देण्यासाठी 500 ची नोट काढायचा. साधारण असे त्याने अनेकदा केले होते. त्यामुळे दुकानदार (Shopkeeper) देखील त्याच्या या कृतीने वैतागला होता. दुकानदाराचे असे झाले होते की दररोज कुठून सुट्टे आणणार आहे. त्यामुळे तो ग्राहक त्याच्या नजरेस बसला होता.  


असा घालायचा गंडा


खरं तर हा चोर खुप शातीर होता. तो दररोज नाश्ता करण्यासाठी 500 ची बनावट नोट घेऊन यायचा. आणि दुकानदाराकडून (Shopkeeper) दररोज 20 रूपयाचा नाश्ता करून 480 रूपय़े खिशात टाकायचा. अशाप्रकारे तो दुकानदाराला दररोज 480 रूपयाचा गंडा घालायचा. 


अशी उलगडली घटना 


आरोपी दररोज 500 रूपयाची नोट आणत असल्याने दुकानदाराला (Shopkeeper) त्याच्यावर संशय आला होता. त्यामुळे दुकानदार गुप्ता यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अगोदरच कल्पना देऊन ठेवली होती. गुप्ता यांनी त्याला ओळखले व कर्मचाऱ्यांच्या मदतीने पकडले आणि पोलिसात दिले.  


पोलिसांनी (Police) येऊन संबंधित ग्राहकाला ताब्यात घेतल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने दुकानदाराला गंडा (Robbery Case) घातल्याची कबूली दिली. त्याचे नाव विजय दशरत थोराईत (४२, बैरामजी टाऊन) असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.