मुंबई : कोरोना व्हायरसचा  वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण आज झालेल्या बैठकीत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नसल्याचा पण कठोर निर्बध लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू होणार आहेत . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- उद्या रात्री ८ पासून कडक निर्बंध
- 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध
- शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन
- मॉल्स, रेस्टॉरंट, बार बंद राहणार
- सिनेमा थिएटर्स आणि नाट्यगृह बंद
- दुकानदार, हॉटेलांना पार्सलची मुभा
- उद्याने बंद राहणार
- रात्री 8 ते सकाळी 7 संचारबंदी
- धार्मिक स्थळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू



बातमी : http://राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नाही; कठोर निर्बध लावण्यात येणार


सामान्य माणसांना रात्रीची प्रवासबंदी असणार आहे. बस, टॅक्सी, रिक्षा सुरूच राहणार. पण रिक्षात  प्रवास करताना फक्त  दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मर्यादित लोकांसह फिल्म शुटिंगला परवानगी देण्यात आली आहे.