गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही विरोध नाही, मात्र
गणेशोत्सावासाठी चाकरमान्यांना `हे` नियम लागू होणार
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सगळ्याच गणेशोत्सवावर सावट आलं आहे. गणेशोत्सव हा सण कोकणात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतात. प्रत्येक चाकरमानी वर्षातून एकदातरी कोकणात गणेशोत्सवासाठी जात असतो. कोकणातील गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट आहे. चाकरमान्यांना कोकणात जायचं असेल तर त्यांना काही नियम अटी पाळाव्या लागणार आहे. यंदाचा गणेशोत्सव मुंबईत अतिशय साधेपद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने केला आहे. त्याला गणेश मंडळांनी देखील पाठिंबा दिला आहे.
गणेशोत्सावासाठी चाकरमान्यांना 'हे' नियम लागू होणार
चाकरमान्यांना गावी गेल्यावर सात दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे.
त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे.
त्यांच्या पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन करणे
कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देण्यात येणार आहे.
त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा.
कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल.
चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.
त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
सिंंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी शांतता समितीची बैठक पार पडली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात (कॉरटाइन ) चौदा दिवस ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देण्यात येणार आहे. त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा अशा विविध विषयांवर शुक्रवार बैठकीत चर्चा करण्यात आली.