पुणे : पुणे शहरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शहरासाठी आणखी एक धरण बांधण्याबाबतची चर्चा गेली अनेक वर्षं सुरु आहे. मात्र, त्यासंदर्भातील व्यवहार्यता तसेच अडचणींचा विचार करता सध्यातरी नवीन धरण बांधण्याचा विचार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे काही वर्षांपासून बांधून पूर्ण असलेल्या भामा आसखेड धरणाचं पाणी पुनर्वसनाच्या प्रश्नामुळं विनावापर पडून आहे. त्यामुळे भामा आसखेडच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याचंही बापट यांनी म्हटलयं. त्यामध्ये पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेला सहभागी करून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 



पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट