सोनू भिडे, नाशिक: 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई वडिलांसाठी सोन्यासारखी असलेली मुलगी ज्याला दिली त्यानेच सासरच्या घरात सोनचांदीवर डल्ला मारल्याची  घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरात (Nashik City) भरदिवसा घरात चोरीची (Theft) घटना घडली होती. याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या घटनेचा तपास करत असताना जावयानेच चोरी केल्याच पोलीस तपासात उघड झाल असून संशयित जावई  (Son In Law) अलोक दत्तात्रय सानपला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे.  


जावयाने अशी केली चोरी


मीरा शशिकांत गंभिरे (वय ५०) ह्या नाशिकच्या गंगापूर रोड वरील ध्रुवनगर येथे वास्तव्यास आहेत. गगापूर परिसरात त्यांचे ब्युटी पार्लर आहे.  त्यांच्या मुलीचे अलोकवर अतोनात प्रेम. म्हणून आईने थाटामाटात या दोघाचाही प्रेमविवाह करून दिला. मात्र अलोक बेरोजगार असल्याने नेहमी सासूच्या घरी बहुतांशी मुक्कामी असायचा. यामुळे त्याला घरात कुठे काय आहे याची संपूर्ण माहिती होती. कपाटात साडे दहा लाखाचे दागिने असल्याची माहिती त्याला मिळाली होती. हे दागिने चोरण्याची तयारी त्याने मनात केली. 


शनिवारी (२४ सप्टेंबर)  दागिने चोरण्याचे ठरले. त्याने सासूच्या नकळत कपाटाची डूप्लीकेट चाबी सुद्धा तयार करून घेतली होती. सासू शनिवारी ब्युटी पार्लरला गेली असताना जावई अलोक हा सासूच्या घरी गेला. शेजारील कुटुंब त्याला ओळखत असल्याने त्याने चेहऱ्याला मास्क लावला. चोरट्याने चोरी केली असावी असे वाटावे  म्हणून तशीच  वेषभूषा करून चोरी केली. 


असा लागला तपास 
घरात चोरी झाल्याची तक्रार मीरा गंभिरे यांनी गंगापूर पोलिसात केली. तपासाकरिता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासले यात एक संशयास्पद व्यक्ती पोलिसांना मिळून आला.चेहरा दिसत नसला तरी संशयित आणि मीरा गंभिरे यांचा जावई यांची देहबोली एकच असल्याच्या संशयावरून पोलिसांनी अलोकला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता संशयित अलोकने आपण चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी त्याला अटक केलीये


मिराबाई अडचणीत


जावई चोर निघाल्यामुळे मीराबाईंची आता पंचाईत झाली आहे . लाडक्या मुलीचं मन मोडायचं नाही म्हणून पुढचा मागचा विचार न करता आलोक शी लग्न लावून दिलं . मात्र जावयाने केलेला प्रकारामुळे आता कपाळाला हात मारायची वेळ आली आहे. तर या सर्व प्रकारामुळे मुलीला आपल्या प्रियकराचं खरं रूप कळाल्यामुळे मानसिक धक्का बसला आहे . समाजासमोर कसं जायचं लोकांना काय सांगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांनी आपलं ब्युटी पार्लर चे नाव सांगू नये अशी विनंती केली तर माध्यम आणि पत्रकारांना त्या टाळाटाळ करत आहेत.