चोरट्यांनी एटीएम मशिन चक्क क्रेनच्या साहाय्याने पळविले
ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एटीएम मशिन चोरट्यांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने चोरून नेले आहे.
धुळे : ऐन दिवाळीच्या तोंडावर चोरट्यांनी धुळे शहरात धुमाकूळ घातलाय. शहरातलं एक एटीएम चोरट्यांनी चक्क क्रेनच्या साहाय्याने चोरून नेले आहे.
शहरातील मालेगाव रोडवरील आस्था रुग्णालया समोरच आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारत ३० लाख रुपये लंपास केलेत. सीसीटीव्हीच्या वायर चोरट्यांनी कापल्याचेही समोर आले आहे.
एटीएममधी कॅमेऱ्याचा डीव्हीआर बँकेने मुंबईत ठेवलाय. दिवाळीत गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय.