गोंधळानंतर विधान परिषदेचं काम दिवसभरासाठी तहकूब
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जोरदार गदारोळानंतर विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय.
नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जोरदार गदारोळानंतर विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय.
विरोधकांनी शेतकरी कर्जममाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधक आणि सत्ताधारी वलेमध्ये उतरले. मोठा गदारोळ झाल्यावर सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलंय.
विधानसभेतही गोंधळ
विधानसभेत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीसाठी विरोधकांनी दिवसाच्या सुरूवातीलाच गोंधळ घातला. कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरु झाल्यावर अजित पवारांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, तोही विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला.
त्यावर कामकाजातून बोंड अळी प्रकरणी विधानसभेतील लक्षवेधी पुढे ढकलली. आणि विरोधी पक्ष आणखी आक्रमक झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार मुद्दाम बाजूला टाकत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी गोंधळात विरोधकांना समजावण्याचाही प्रयत्न केला. शेवटी प्रतिष्ठेचा विषय न करता विरोधकांनी चर्चेला सुरूवात करावी, अशी मुख्यमंत्र्यांनी केली.