Third Mumbai  Mumbai 3.0 : मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय देण्यासाठी तिसरी मुंबई विकसीत केली जात आहे. तिसरी मुंबई हा महाराष्ट्राच्या विकासातील सर्वात मोठा मास्टर प्लान आहे. महायुती सरकारने तिसरी मुंबई विकसीत करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु केल्या आहेत. नव्याने विकसीत होणारे तिसरी मुंबई हे शहर मुंबई पेक्षा तिप्पट मोठी असेल असा दावा केला जात आहे. कशी असेल ही तिसरी मुंबई इथं सर्वसामान्यांना घरं खरेदी करणं परवडेल का?  जाणून घेऊया. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणच्या (एमएमआरडीए) माध्यमातून तिसरी मुंबई अर्थात हे नवे शहर निर्माण केले जाणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय देण्यासाठी तिसरी मुंबई विकसीत केली जात आहे. नवी मुंबई विमानतळानजीकच्या परिसरात एक नवं शहर उभारलं जात आहे. 'थर्ड मुंबई' अर्थात 'तिसरी मुंबई' (Third Mumbai) म्हणून विकसीत केले जाणारे हे शहर कर्नाळा-साई-चिरनेर न्यू टाऊन अर्थात KSC न्यू टाऊन (Karnala-Sai-Chirner New Town- KSC New Town) असे नावाने ओळखले जाणार आहे. एमएमआरडीएने हे नाव ठेवले आहे. ही तिसरी मुंबई जवळपास  324 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विकसीत केली जाणार आहे. या तिसऱ्या मुंबईमध्ये उलवे, पेण, पनवेल, उरण, कर्जत आणि आजुबाजूच्या परिसरातील 100 हून अधिक गावांचा समावेश असेल. 


 एखाद्या विकसित शहरात ज्या   सोईसुविधा नागरिकांना मिळतात. त्या सर्व सुविधा या नव्यानं उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईमध्ये मिळणार आहेत. या शहराला कनेक्टीव्हीटीच्या उत्तम सुविधा मिळणार आहेत. तिसऱ्या मुंबईचा मास्टर प्लॅन 2026 च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. 2025 मध्ये तिसरी मुंबई स्थापन करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाणार आहे. सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंपनीची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक कंपन्या 13 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षणासाठी अर्ज करू शकतात. सर्वप्रथम ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. यानंतर तज्ञ आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सखोल विश्लेषण केले जाईल. हवाई सर्वेक्षणाव्यतिरिक्त ग्राउंड डेटा गोळा करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे. व्हिजन डॉक्युमेंट, मास्टर प्लॅन आणि तपशीलवार विकास आराखडा तयार केला जाणार आहे.


तिसरी मुंबई डेटा हब म्हणून विकसीत करणार


सर्वेक्षणादरम्यान 124 गावांची तसेच आसपासच्या परिसराची माहिती संकलित करण्यात येणार आहे. तिसरी मुंबई   डेटा सेंटर हब म्हणून विकसित करण्याची योजना सरकारने आखली आहे. देशातील 65 टक्के डेटा साठवण्यासाठी पायाभूत सुविधा येथे तयार केल्या जातील. यासह तिसऱ्या मुंबईत आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क यांचा समावेश असेल. तसेच येथे मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती देखील निर्माण केल्या जाणार आहेत.