`या` जोडप्याने लग्नात एकमेकांच्या गळ्यात घातले साप!
सोशल मीडियामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात.
मुंबई : सोशल मीडियामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मक. तर काही विचित्र असतात. आणि अशा काही वेगळ्या विक्षिप्त गोष्टी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ समोर आलं आहे.
२०१० मध्ये झालेल्या लग्नाचा हा व्हिडीओ आहे. मात्र हे लग्न सामान्य नसून काहीसं वेगळं आहे आणि त्याचं वेगळेपण व्हिडीओ बघताच तुमच्या लक्षात येईल. या लग्नाचे वेगळेपण म्हणजे लग्नात वधू वराने एकमेकांना फुलांची माळ न घालता चक्क एकमेकांच्या गळ्यात साप घातले.
आपले लग्न काहींसे खास असावे, त्यात काही वेगळेपण असावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र या लग्नातील वेगळेपण चक्रावून टाकणारे आहे.
हा व्हिडीओ बीडमधला असल्याचे समजतंय. काही वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या जोडप्याचं नाव सिद्धार्थ आणि सृष्टी असल्याचे समजतंय. नोव्हेंबर २०१० मध्ये हे जोडपे विवाहबद्ध झाले. ते दोघेही वनखात्यात कामाला आहे. लग्नानंतर दोघांनीही सापांना जंगलात सोडले. त्यांच्या लग्नाचा हा व्हिडीओ जवळजवळ सात वर्षांनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.