किरण ताजणे, नाशिक : मराठीमध्ये शिकून युवकांना नोकरी मिळत नसल्याचे धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे. नाशिकमधल्या विद्यार्थ्यांनी हे सर्वेक्षण केले आहे. मराठी भाषेबद्दल काय वास्तव समोर आले. ज्या मराठीचे गोडवे अभिमानाने गायला हवे, त्याच महाराष्ट्रात मराठीबद्दल धक्कादायक सत्य समोर आले आहे. नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आणि आरवायके महाविद्यालयच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी नुकतंच एक सर्वेक्षण केले त्यानुसार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणजे काय ७४ टक्के विद्यार्थ्यांना माहीत नाही. इतर भाषांच्या तुलनेत मराठी अवघड असल्याचे ४९ टक्के तरुणांना वाटते. मातृभाषेत हिंदी आणि इंग्रजी भाषांतल्या शब्दांचा वापर वाढलाय असे ८४ टक्के युवकांना वाटत आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे ९८ टक्के तरुणांना मराठी मातृभाषा असल्याचा अभिमान आहे, असे विद्यार्थी प्राची कराळे, भूषण क्षीरे यांनी सांगितले.


चिंताजनक बाब म्हणजे मराठी माध्यमातून शिकल्यामुळे नोकरी मिळायला अडचण येते, असे मराठी तरुणांना वाटते.  खरं तर मातृभाषेतूनच शिक्षण हवं, हा जागतिक स्तरावर सिद्ध झालेला सिद्धांत आहे. पण मराठीबद्दलची सरकारी, प्रशासकीय आणि पालकांमधलीही उदासीनता यामुळेच मराठीचा घात झाला आहे. आणि दुर्दैवाने आपुल्या घरात हाल सोसते मराठी हेच वास्तव आहे. याबाबत पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक रमेश शेजवळ यांनीही आपले मत व्यक्त केले.