मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे.. सांगलीतील क्रांतीसिह नाना पाटील पुतळा ते कोल्हापूरातील दसरा चौकापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवात झाली  असून या मोर्चात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार आहेत असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी आंदोलन हे या शतकातील सर्वात मोठं आंदोलन आहे. दोनवेळा मुंबईला मोर्चा काढला तरी देखील सरकार हे मुठभर शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असं दर्शवलं जात आहे. आम्हाला दिल्लीत जायला मज्जाव केला असला तरी हरयाणा, पंजाब शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा असल्याचं आम्ही दर्शवत आहोत. अतिशय शिस्तबद्धपद्धतीने केलेलं शेतकऱ्यांचं संचंलन असल्याचं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी म्हणाले. 


केंद्राचे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं किसान मोर्चाचे डॉ. अजित नवले यांनी म्हटल आहे. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रती जबाबदारी ओळखावी असं नवले यांनी म्हटल आहे.