मुंबई : ईडीकडून अटक झाल्यानंतर राष्टवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपली अफिली प्रतिक्रिया ट्विट करून दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले. सतत सात तास चौकशी केल्यांनतर ईडीने मलिक यांना अटक केली.


 



अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना जे. जे. इस्पितळात मेडीकलसाठी नेण्यात आलं. येथे त्यांचे मेडिकल झाल्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येणार आहे. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 


ईडीने केलेल्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी एक ट्विट केलंय. यात त्यांनी "लडेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे" असं म्हटलंय.